सरस्वतीला मनवण्याचा मोठ्या मालकांचा हटके अंदाज …
सरस्वती मालिकेमध्ये अचानक सारा आल्यामुळे बरचसे तणावाचे वातावरण होते. आता सारा सरस्वतीला राघवपासून दूर करण्याचा प्रयत्न करेल? की तिला सरस्वती मुळात कशी आहे हे कळल्यावर सारा बाजूला होईल? राघवच्या मनात असलेल्या भोळ्या-भाबड्या आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सरस्वतीच काय होईल ? ऑस्ट्रेलिया वरून आलेली सारा सरस्वतीची जागा कधी घेऊ शकेल? सरस्वतीला आपण सारा पेक्षा कुठे कमी तर नाही ना पडत आहे अशी भावना तर येत नाही ना? काय होईल पुढे सरस्वती कोणता मार्ग अवलंबवेल? या न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी काय करेल सरस्वती ह्या सगळ्या प्रश्नांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण सत्य आता सगळ्यांनाच कळले आहे.
सरस्वतीमध्ये सत्य समोर आल्यामुळे सगळ निवळल असल तरी सुध्दा सरस्वती जरा नाराजच आहे. सरस्वतीने सारा हिला चांगलाच धडा शिकवला आणि घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले आणि ती बाहेर गेली देखील. पण आता सरस्वतीचा बिघडलेला मूड निट करण्यासाठी मोठे मालक बरेच प्रयत्न करत आहेत असे दिसून येत आहे. बायकोचा मूड खराब झाला की तिला मनवण किती कठीण असत हे एखादा नवराच सांगू शकतो वा त्यालाच कळू शकत. सरस्वती प्रिय असलेली ठमी मोठे मालक म्हणजेच राघव तिला भेट म्हणून देणार आहेत. तसेच मोठ्या मालकांनी सरस्वतीसोबत ठमीवर बसून एक राउंडदेखील मारला. सायकल ह्या सारख अनोख गिफ्ट मोठ्या मालकांनी सरस्वतीला दिलं आहे. जे सध्य स्थितीला अनुसरून आहे आणि योग्य देखील आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी दुचाकीचा वापर करावा हा संदेशच यातून प्रेक्षकांना दिला आहे अस बोलायला हरकत नाही. तसेच सरप्राईझ म्हणून लाल गुलाबांचा गुच्छ देखील दिला. आता पुढे काय होईल हे तुम्हाला लवकरच कळेल.
[jwplayer cn3BBd2B]
दरम्यान, सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. तितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती हि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. मालिकांच्या शुटिंग साठी सगळेच कलाकार १२ तास सेटवर असतात जणू सेट हेच त्यांचे दुसरे घर बनलेले असते. कलाकारांच त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, मेक अप दादा या सगळ्यांशीच खूप छान नात असत. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे कलाकारांची मेक अप रूम जी त्यांच्यासाठी खूप स्पेशल असते. ज्या रुममध्ये सकाळी आल्यापासून ते पॅकअप होईपर्यंत रहातात. आपला अर्ध्याहून अधिक वेळ कलाकार याच मेकअप रुममध्ये असतात. आणि आपल्या लाडक्या तीतीक्षाने तिची मेकअप रुम खूपच सुंदररीत्या पेन्ट केली आहे. सरस्वतीच जणू परीमय जगच आहे हि मेक अप रूम. या रुमच्या भितींवर खूप सुंदर अशी परी वा मुलीचा चेहरा काढला आहे आणि लिहील आहे keep on dreaming. तितिक्षा म्हणाली की, ती उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणारी मुलगी आहे. त्यामुळे तिने पेन्टिंगच्या सुरुवातीला keep on dreaming असे लिहिले आहे.