येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे.

जॉनसोबतच यामध्ये मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर आणि आयशा शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एकाहून एक असे दमदार संवाद या जवळपास तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी जॉन एकटाच मैदानात उतरला आहे. तर सीरिअल किलरच्या शोधात असलेला पोलिस अधिकारी मनोज साकारतो आहे.

रणवीरच्या करिअरमधील सर्वांत धमाकेदार गाणं, पाहा हा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील गाजलेलं ‘दिलबर’ गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जनसुद्धा पाहायला मिळत आहे. मिलाप मिलन दिग्दर्शित या चित्रपटासमोर आणखी दोन चित्रपटांचं आव्हान आहे. कारण १५ ऑगस्ट रोजीच अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि देओल ब्रदर्सचा ‘यमला पगला दिवाना फिर से’ हे चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहेत. जॉनचा यापूर्वी आलेल्या ‘परमाणू’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. साहजिकच यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘सत्यमेव जनते’ला बॉक्स ऑफीसवर कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.