एकाच दिवशी दोन ते तीन चित्रपट प्रदर्शित करण्याचा फटका एका तरी चित्रपटाला बसतोच असं म्हटलं जातं. याला जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ मात्र अपवाद ठरतोय. कारण स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर पाच दिवसांत ५६.९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाला समीक्षकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवाय अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाचंही आव्हान समोर होतं. तरीसुद्धा या सर्वांचा परिणाम ‘सत्यमेव जयते’च्या कमाईत होताना दिसत नाही. त्यामुळे निश्चितच जॉन अब्राहमसाठी ही आनंदाची बाब ठरत आहे. त्याचबरोबर या वर्षांत सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत जॉनचा ‘सत्यमेव जयते’ पाचव्या स्थानावर आहे.
#SatyamevaJayate packs a STRONG *extended* opening weekend total… Went downhill on Day 2, but remained consistent from Day 3 to Day 5… Weekdays biz is crucial… Wed 20.52 cr, Thu 7.92 cr, Fri 9.18 cr, Sat 9.03 cr, Sun 10.26 cr. Total: ₹ 56.91 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 20, 2018
Gold box office collection Day 5: अक्षयच्या सुपरहिट चित्रपटांची हॅट्रिक ठरणार का ‘गोल्ड’?
मिलाप झवेरी दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा आहे जो अत्यंत क्रोधेने आणि हिंसेने भ्रष्टाचाराविरोधात लढत असतो. यामध्ये अमृता खानविलकर, देवदत्त नागे असे मराठी चेहरेही झळकले आहेत. तेव्हा आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘सत्यमेव जयते’ची पाच दिवसांची कमाई-
बुधवार (१५ ऑगस्ट)- २०.५२ कोटी रुपये
गुरुवार (१६ ऑगस्ट)- ७.९२ कोटी रुपये
शुक्रवार (१७ ऑगस्ट)- ९.१८ कोटी रुपये
शनिवार (१८ ऑगस्ट)- ९.०३ कोटी रुपये
रविवार (१९ ऑगस्ट)- १०.२६ कोटी रुपये