रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकल ट्रेन आणि बसमधून प्रवास करताना प्रवाशांसाठी इंटरनेट मनोरंजनाचे साधन ठरतेय. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम असो किंवा व्हर्च्युअल गेम असो या गोष्टी लोकांसाठी विरंगुळ्याचे माध्यम झाल्यात. सध्याच्या घडीला ‘ल्युडो’ने लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनाच वेड लावलंय. काही वर्षांपूर्वीपर्यंत सापशिडीची पाटी आणि त्यासोबत असणाऱ्या रंगीबेरंगी सोंगट्या आपण पाहत आलो. मात्र, आता हा गेम मोबाईलवरही खेळता येतो आणि या खेळाचे वेड आता चक्क बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मालाही लागले आहे.

वाचा : अखेर एकमेकांसमोर येणार सलमान – ऐश्वर्या

शाहरुख आणि अनुष्का हे आनंद एल राय यांच्या चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहेत. ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’, ‘जब हॅरी मेट सेजल’नंतर या जोडीचा हा चौथा चित्रपट असेल. जवळपास गेली दहा वर्षे एकमेकांना हे दोघं ओळखत असून, त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रीकरणातून वेळ मिळाला की हे दोन्ही कलाकार ल्युडो खेळत बसतात. याविषयी सेटवरील एका व्यक्तीने मुलाखतीत म्हटले की, शाहरुखला गेम्सचे किती वेड आहे हे काही नव्याने सांगायला नको. वेळ मिळताच तो त्याच्या डिजिटल डिव्हाइसवर गेम खेळत असतो. आता तर त्याला अनुष्काच्या रुपात नवी गेम पार्टनर मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुख दोघांनाही ल्युडोने वेड लावले आहे. इतकेच नव्हे तर रायसुद्धा त्यांच्यासोबत गेम खेळत बसतात. हा गेम खेळण्याचा जणू सेटवर संसर्गच झाला असल्याचे वाटते. कारण, क्रू मेंबर्सही आता शाहरुखला गेममध्ये साथ देऊ लागले आहेत.