दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलिसांचा ‘उमंग’ कार्यक्रम यावर्षीही मोठ्या उत्साहाने पार पडला. ‘उमंग २०१८’ या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनपासून ते किंग शाहरुख खानपर्यंत आणि आलिया भट्टपासून कंगना रणौतपर्यंत साऱ्यांनीच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. उपस्थितांपैकी साऱ्यांनीच पोलिसांच्या शौर्याचे आणि अथक मेहनतीचे भरभरून कौतुक केले.

https://twitter.com/MumbaiPolice/status/952272690374692874

अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आमिर खान, क्रिती सनॉन, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि प्रभू देवा यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलिसांच्या कॅलेंडरच्या तिसऱ्या आवृत्तीचे अनावरण केले.

https://twitter.com/MumbaiPolice/status/952236618122956800

https://twitter.com/MumbaiPolice/status/952270220839747592

https://twitter.com/MumbaiPolice/status/952267840161308672

https://twitter.com/MumbaiPolice/status/952240357525291008

संपूर्ण बॉलिवूड उमंग महोत्सवात आले म्हटल्यावर तिकडे बॉलिवूडचा तडका पाहायला मिळणार नाही असे तर होणार नाही. शाहरुखने त्याची ‘सिग्नेचर स्टेप’ करुन दाखवली तर दीपिका आणि रणवीरच्या उपस्थितीनेच अनेकांची मनं जिंकली. अनिल कपूर आणि अर्जुन कपूर हे ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर थिरकले. डान्सर प्रभू देवाच्या चाहत्यांना त्याला प्रत्यक्ष नाचताना पाहणं हा एक अविस्मरणीय क्षण होता. हृतिक रोशन आणि इतर कलाकार मुंबई पोलिसांचे आभार मानायला विसरले नाही. रणबीर कपूर, मलायका अरोरा, क्रिती सनॉन यांनीही त्यांच्या डान्सने उपस्थितांचे मनोरंजन केले.

https://twitter.com/MumbaiPolice/status/952281019327090690

https://twitter.com/MumbaiPolice/status/952289135728975872

https://twitter.com/MumbaiPolice/status/952288577429401606

https://twitter.com/MumbaiPolice/status/952287012735811585

गायक मिका सिंगने ‘ता रा रा रा’ आणि ‘इश्क तेरा तडपावे’ ही दोन गाणी गायली. आलिया भट्टने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातील ‘तेरे बिना गुझारा है मुश्किल’ हे गाणे मुंबई पोलिसांना समर्पित केले. अक्षय कुमार, सुनिल ग्रोवर आणि मनिष पॉल यांनीही त्यांच्या विनोदाच्या तडक्याने उपस्थितांना खळखळून हसवले. फार कमी कार्यक्रम असे असतात जिकडे कंगना आणि हृतिक समोरा समोर येतात. ‘उमंग २०१८’ हा त्याच कार्यक्रमांपैकी एक ठरला.

https://twitter.com/MumbaiPolice/status/952285484008525824

https://twitter.com/MumbaiPolice/status/952278260997672960

https://twitter.com/MumbaiPolice/status/952212542956474368

https://twitter.com/MumbaiPolice/status/952205352807927809

https://twitter.com/MumbaiPolice/status/952205258486419456

https://twitter.com/MumbaiPolice/status/952199959381757954