अभिनेता शाहरूख खानच्या विरोधात बडोदा रेल्वे स्टेशनवर ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूसंबंधी खटला दाखल होऊ शकतो. पोलीस उपाध्यक्ष (पश्चिम रेल्वे) तरूण बरोत न्यायालयात अहवाल सादर करताना म्हणाले की, ‘२३ जानेवारी रोजी झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी शाहरूख खान आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडवर आईपीसी कलम 304 ए 2 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि रेल्वे अॅक्टअंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.’ पोलिसांनी १७ एप्रिल रोजी संपूर्ण घटनेचा अहवाल सुपूर्द केला होता. या अहवालात शाहरूखमुळे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि शाहरूखच्या टीमने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर शाहरूखने आपला टी-शर्ट आणि चेंडू फलाटावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने भिरकावल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

या घटनेनंतर तक्रार दाखल करणारे वकील जितेंद्र सोलंकी यांनीसुद्धा एक अहवाल तयार केला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘जर शाहरूख खान टी-शर्ट, चेंडू आणि इतर वस्तू लोकांच्या दिशेने भिरकावल्या नसत्या तर अशी घटना घडली नसती. त्यामुळे एक्सेल एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडचे मालक आणि अभिनेता शाहरूख खानवर आईपीसी कलम 279 (निष्काळजीपणा), 336 (दुसऱ्यांचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात आणणे), 337 (स्वत:चे प्राण धोक्यात आणणे आणि इतरांच्याही सुरक्षेबद्दल निष्काळजीपणा बाळगणे), 338 (स्वत:चे प्राण धोक्यात आणणे आणि दुसऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी गंभीर त्रास होणे), 304 ए 2 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि रेल्वे अॅक्ट 145,152,175 आणि 179 अंतर्गत खटला दाखल होऊ शकतो.’

वाचा : पुन्हा एकदा सलमान आणि लुलिया आले एकत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२३ जानेवारी रोजी शाहरूख आपल्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबई ते दिल्ली प्रवास करत होता. जेव्हा ही ट्रेन बडोदा स्टेशनला पोहोचली आणि शाहरूख स्टेशनबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करण्यासाठी बाहेर आला तेव्हा तिथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागला आणि त्यादरम्यान गर्दीत फरीद खान नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाहरूखच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.