शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ‘स्टारकिड्स’च्या प्रसिद्धीच्या शर्यतीत नेहमीच अग्रस्थानी असते. सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पदार्पणापूर्वीच तिचा स्वत:चा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही अधिराज्य गाजवणाऱ्या सुहानाला कलाविश्वात तिचा पहिला प्रोजेक्ट मिळाला आहे. ती लवकरच एका मासिकाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती तिची आई गौरी खानने दिली आहे.

‘सुहाना एका मासिकासाठी शूट करणार आहे. त्या मासिकाचं नाव मी आता सांगू शकणार नाही पण तिच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी मी फार उत्सुक आहे,’ असं गौरी म्हणाली.

सुहानाला बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याची इच्छा आहे असे शाहरुखने याआधी सांगितले होते. ती सध्या तिच्या कॉलेजमधील रंगभूमीवर चांगले काम करत असल्याचे शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले होते. फक्त शाहरुखच नाही तर सुहानाच्या अभिनयाचे कौतुक शबाना आझमी यांनीही केले आहे.

वाचा : न केलेल्या मदतीसाठी आलियाने मानले वडिलांचे आभार

सुहाना भारतात असो किंवा नसो ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. एखाद्या कार्यक्रमातील तिची उपस्थिती प्रसारमाध्यमांचं विशेष लक्ष वेधून घेते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी ती मेहनत घेत असून अभिनयाचे धडे गिरवत असल्याची चर्चा होती. प्रेक्षकांनाही सुहानाला रुपेरी पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून राहिली असेल यात काही शंका नाही.