बॉलिवूड सेलिब्रिटी किड्सपैकी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सातत्याने प्रकाशझोतात असते. बॉलिवूड पार्ट्या आणि कार्यक्रमांमधील तिच्या हजेरीची विशेष चर्चा होते. नेहमीच विविध रुपांमध्ये दिसणारी सुहाना तिच्या कपड्यांच्या आणि लूकच्या बाबतीतही सजग असते. सुहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधील तिच्या बोल्ड अंदाजाची चर्चा होऊ लागली आहे.

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सुहाना पांढरा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पाहायला मिळते. फोटोवर तिच्या चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींनी तिच्या या बोल्ड अंदाजाची स्तुती केली तर काहींनी टीकासुद्धा केली आहे. खरंतर बोल्ड आणि गॅमरस लूकमुळे सुहाना चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुहानाचा स्विमसूटमधला फोटो चांगलाच चर्चेत आला होता.

https://www.instagram.com/p/BcPzHVvBRd1/

नेहमीच आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी किंग खानची ही लाडकी लेक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मध्यंतरी सुहानाने दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या स्टुडिओमध्येही हजेरी लावली होती. सुहानाला बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याची इच्छा आहे असे शाहरुखने याआधी सांगितले होते.

https://www.instagram.com/p/BbZsXRwFEZf/

https://www.instagram.com/p/BY8ySI0n0wI/