बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार किडसवर कायमच सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कधीकधी तर बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांचीच चर्चा अधिक होताना दिसते. हे स्टार किड्सही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत राहत असतात. त्यातही जर शाहरुख खानच्या मुलीची चर्चा असेल तर मग काही विचारुच नका… तिच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते तिच्या स्टाईलिंगपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. दिवाळीनंतर नुकतीच ती आपल्या मैत्रिणी शायना कपूर आणि अहाना पांडे यांच्यासोबत पुन्हा एकदा दिसली.

पांढऱ्या रंगाच्या स्लीवलेस टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये ती फार सुंदर दिसत होती. या तिच्या कपड्यांशिवाय तिच्या शूजवरही अनेकांचे लक्ष जाते. चमकदार पांढरा रंग आणि त्यावर सोनेरी रंगाच्या पट्ट्या असलेल्या तिच्या शूजच्या जोडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पण या शूजची किंमत तुम्हाला कळल्यावर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील यात काही शंका नाही. या शूजची किंमत एवढी आहे की त्याबदल्यात तुम्ही एखादी परदेश वारीही करु शकता.

ई-कॉमर्स वेबसाइटवर या शूजची किंमत ६४ हजार रुपये आहे. काही लोकांच्या पगारापेक्षाही जास्त या शूजची किंमत आहे. जेवढी या शूजची किंमत आहे तेवढ्या रुपयांत एखाद्याची थायलंड ट्रीप तर नक्कीच होऊ शकते. सुहानाच्या कपड्यावर चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही कपडे आणि अॅक्सेसरीजमुळे ती चर्चेत आली आहे. आई गौरी खानने डिझाइन केलेल्या एका रेस्तराँच्या उद्घाटनावेळी तिने केशरी रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत जवळपास ३० हजार रुपये इतकी होती.