शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून सिगरेट ओढतो हे तर साऱ्यांनाच माहित आहे. शाहरुखला त्याचे व्यसन सोडायचे होते. पण काही केल्या त्याच्याकडून हे होतच नव्हते. यामुळे अनेकदा त्याची तब्येतही बिघडली. पण नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने सिगरेटचे व्यसन कमी झाल्याचे सांगितले. तो सध्या फावल्या वेळात सिनेमा पाहतो. गेल्या काही काळापासून त्याला सिनेमेच पाहायला मिळत नव्हते. पण आता तो ठरवून सिनेमे पाहतो, यामुळे सिगरेटच्या व्यसनापासून तो थोडा दूर जात आहे.

सिनेमांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘नुकताच मी ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ पाहिला. तसेच आनंद एल राय यांचा ‘शुभ मंगल सावधान’ आणि आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमाही पाहिला. हे सिनेमे गेल्या वर्षी फार पुर्वीच प्रदर्शित झाले असले तरी मी ते सरत्या वर्षात पाहत आहे. एवढेच काय तर बॉलिवूडच्या बादशाहने ‘टायगर जिंदा है’ सिनेमा आता पाहिला.’ या सिनेमांच्या यादीत ‘बरेली की बर्फी’ सिनेमा त्याला आवडला. एका मागोमाग एक सिनेमे सध्या तो पाहत आहे. त्यामुळेच त्याचे सिगरेट ओढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.

शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो आनंद एल राय याच्या ‘झिरो’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या टायटलची घोषणा नुकतीच त्याने सोशल मीडियावर केली आहे. या सिनेमात तो दुहेरी भूमिका साकरणार असून त्यातली एक भूमिका ही ठेंगण्या व्यक्तीची असणार आहे. शाहरुखसोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या वर्षी २१ डिसेंबरला ‘झिरो’ होऊन शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.