अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. इम्तियाझ अली दिग्दर्शित या सिनेमात अनुष्का शर्माचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शाहरुखने सोमवारी इम्तियाजसोबत एक सेल्फी काढला आणि इन्स्टाग्रामवर शेअरही केला. शाहरुख आणि इम्तियाज पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.
Father’s Day 2017: माझा बाबा बेस्ट फ्रेंड- केतकी माटेगावकर
शाहरुख म्हणाला की, ‘एक दिग्दर्शक म्हणून तो सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्या कामाच्या पद्धतीने तो मला अनेकदा यश जोहर यांची आठवण करून देतो. यश चोप्रा नेहमी प्रेम कथेवर सिनेमा करायचे. संपूर्ण भारतभर ती कथा फिरायची पण त्याला एक खास असा पंजाबचा टचही असायचा. ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमाची कथा एक पर्यटक मार्गदर्शक आणि त्याच्या प्रेम कहाणीवर भाष्य करते. या सिनेमात वेगवेगळी ठिकाणं जरी दिसत असली तरी हा काही प्रवासावर बेतलेला सिनेमा नाही. हा एका टुरिस्ट गाइडच्या प्रेम कथेवर बेतलेला सिनेमा आहे. दोन भिन्न व्यक्ती कुठे तरी कधी तरी एकत्र भेटतात, एकत्र फिरतात… अशी या सिनेमाची कथा पुढे सरकत जाते,’ असे शाहरुखने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Toilet Ek Prem Katha: पंतप्रधानांनीही केली अक्षयच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ची प्रशंसा
शाहरुख आणि अनुष्काचा हा एकत्रित असा तिसरा सिनेमा आहे. याआधी या दोघांनी ‘रब ने बना दी जोडी’, ‘जब तक है जान’ या दोन सिनेमांत एकत्र काम केले होते. याशिवाय अनुष्काच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात शाहरुखने पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली होती. या सिनेमांशिवाय हे दोघं लवकरच आनंद एल राय यांच्या सिनेमात एकत्र दिसू शकतात. या सिनेमात शाहरुखने ठेंगण्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
[jwplayer vHWwwhkk]