आजकाल अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांकडून चित्रपटांच्या प्रमोशनवर विशेष भर दिले जाते. त्यासाठी वेगवेगळे मार्ग, अनोख्या कल्पनांद्वारे आपण कशाप्रकारे प्रेक्षकांना आकर्षित करतोय हे महत्त्वाचे ठरते. कारण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हटके प्रमोशन हाच फंडा महत्त्वाचा आहे. यासाठीच किंग खानसुद्धा त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवनवीन कल्पना घेऊन समोर येतोय.
शाहरूख खान सध्या ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि त्यासाठी तो सर्व प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळेच तो परदेशात असूनही प्रमोशनसाठी वेगवेगळे मार्ग शोधतोय. नुकतेच त्याने अमेरिकन डीजे डिप्लोसोबत एक व्हिडिओ शूट केला. ट्विटर अकाऊंटवरून शाहरूखने त्याच्यासोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केलाय. ‘डिप्लोच्या व्हिडिओ शूटमध्ये मला एका भूमिका आणि जॅकेटसुद्धा मिळालाय…धन्यवाद,’ असे कॅप्शन त्याने त्या फोटोला दिले.
Walked into the video @diplo is making for Phurrr! Got a starring role in it & his Decent jacket. Wes u r dope! Thx pic.twitter.com/1DLxfcAP3n
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 22, 2017
With the legend @iamsrk pic.twitter.com/q3ul2JUmFn
— diplo (@diplo) July 24, 2017
वाचा : …म्हणून इम्तियाजचा पारा चढला
डिप्लोनेसुद्धा शाहरूखसोबतच्या त्याच्या या गाण्यामधील एक फोटो शेअर केला असून, ‘दिग्गजासोबत काम करतोय,’ असे त्याने कॅप्शन दिले. डिप्लो आणि शाहरूखचा हा म्युझिक व्हिडिओ चित्रपटाच्याच प्रमोशनचा भाग आहे. ‘फूर्रर्र’ असे या म्युझिक व्हिडिओचे शीर्षक आहे. शाहरूख आणि अनुष्काचा ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपट येत्या ४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. इम्तियाज अलीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले.