किंग खान शाहरूखने त्याच्या मुलाला एक सक्त ताकिद दिली आहे. कोणत्याही मुलीला किस करू नकोस अशी सक्त ताकीद त्याने आर्यनला दिलीये. ‘जर तू कोणत्याही मुलीला किस केलंस तर मी तुझे ओठ चिरेन’, असं देखील शाहरूखने आर्यनला बजावलंय. आपल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये शाहरूख जरी सदैव व्यस्त असला आपल्या मुलांना वेळ द्यायला तो कधीच चुकत नाही. चित्रपटांप्रमाणेच किंग खान आपल्या मुलांच्याही तितकाच जवळ आहे. शाहरूखचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने त्याला शाहरूख अनेक सल्ले देत असतो. मात्र यावेळी शाहरूखने आर्यनला कोणत्याही मुलीला किस न करण्याची सक्त ताकीदच दिली आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पत्रकाराने शाहरूखला विचारले की, ‘जर आर्यनने कोणत्या मुलीला किस केलं तर त्यावर तुझी काय प्रतिक्रिया असेल?’ या प्रश्नावर त्याने थेट शब्दांत उत्तर दिलं आणि या उत्तरात मुलींसाठी शाहरूखची असलेली काळजीसुद्धा लक्षात येत होती. शाहरूखने आपल्या उत्तरात म्हटलं की, ‘मी आर्यनचे ओठच चिरेन. मी त्या मुलीचे ओठ चिरू शकत नाही कारण हे एका चांगल्या पुरूषाला शोभा देत नाही. त्यामुळे त्या मुलीच्या वडिलांऐवजी मीच आर्यनचे ओठ चिरेन. तुम्ही एका मुलीला स्पर्श किंवा तिला त्रास देऊ शकत नाही.’
वाचा : ‘त्या’ महिला पत्रकाराच्या अज्ञानावर ‘ट्युबलाइट’च्या बालकलाकाराने पाडला उजेड
याआधीसुद्धा शाहरूखने अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. करण जोहरने एकदा शाहरुखला प्रश्न विचारला की, ‘एखादा मुलगा सुहानाच्या जवळ आला किंवा तिला किस केलं तर तू काय करशील?’ या प्रश्नावर आधी शाहरुख फार त्रासलेला दिसला नंतर तो म्हणाला की, ‘मी त्या मुलाचे ओठच चिरेन. याचा विचारही कोणी करु नये.’ शाहरूख आता मुलगा आर्यनच्या करिअरसाठी खूप गंभीर झाला आहे. त्यामुळे कोणत्याही वाईट बातमीमुळे आर्यनचे नाव भविष्यात अडचणीत येऊ नये अशी शाहरूखची भावना असणे हे स्वाभाविक आहे. आतापासूनच आर्यनला प्रत्येक गोष्टीची ट्रेनिंग मुलगा आर्यनला देतोय. शाहरूखचे हे उत्तर ऐकल्यानंतर आपल्या मुलांबद्दल तो खूपच कठोर आहे असे लक्षात येतेय.