बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने नुकतेच एक असे ट्विट केले आहे जे पाहून प्रथम त्याच्या ट्विटवर तुमचा विश्वासही बसणार नाही. शाहरुखने त्याच्या ट्विटमध्ये फराह खानने त्याचे शोषण केल्याचे म्हटले. पण हे त्याने गंभीरपणे नव्हे तर मस्करीत म्हटले आहे.

त्याचं झाले असे की, फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने अनेक कलाकारांनी गुरूवार सकाळपासूनच सिनेमाशी निगडीत अनेक किस्से आणि फोटो शेअर करायला सुरूवात केली. फराह खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत आणि शाहरुख खानपासून ते शिरीष कुंदरपर्यंत साऱ्यांनीच आपले आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

यावेळी फराहने सिनेमातील शाहरुखचा एक शर्टलेस फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना फराहने लिहिले की, ‘शाहरुख तू माझ्या सांगण्यावरुन शर्टलेस झालास आणि याला एक ट्रेंडच बनवून टाकलेस.’

शाहरुखने ‘ओम शांती ओम’ सिनेमात ‘दर्दे डिस्को’ गाण्यात आपले शर्ट उतरवले होते. यावेळी त्याच्या सिक्स पॅक अॅब्सचीही भरपूर चर्चा झाली होती. या गाण्यानंतरच कलाकारांमध्ये सिक्स पॅक अॅब्सची क्रेझ सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंग खाननेही फराहच्या या ट्विटला रिट्विट करत जसेच्या तसे उत्तर दिले. शाहरुखने ट्विट करत म्हटले की, ‘जसे मी आधीही म्हणालो आहे की, हे मी फक्त तुझ्यासाठीच केले. तुझ्याशिवाय मी कोणासाठीही शर्ट उतरवू शकत नाही. टॉम क्रुझने जसे म्हटले त्याच प्रमाणे तू माझं शोषण केलंस.’