अभिनयासोबतच अफलातून डान्ससाठी काही अभिनेते ओळखले जातात आणि त्यामध्ये शाहिद कपूरचं नाव आवर्जून घेतलं जातं. डान्सच्याच माध्यमातून शाहिदने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आता त्याचा सावत्र भाऊ इशान खट्टरसुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. इशान हा दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून त्याच्या प्रमोशनमध्ये इशान सध्या व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमात इशानचा अफलातून डान्स पाहायला मिळाला.

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातील ‘छोटे मोटर चला’ या गाण्यावर इशानने केलेला डान्स पाहून कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक थक्क झाले. काही वेळातच त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आणि ते व्हायरलसुद्धा झाले. त्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अनेकांनी शेअर केला असून नेटकऱ्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

https://www.instagram.com/p/BhP0Y0nBNZ6/

वाचा : ‘..तर मी लग्नाची तारीख ठरल्याची बातमी ओरडून जगाला सांगेन’

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI इशानचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनंतर अनेकांनी त्याच्या अभिनय कौशल्याचं कौतुक केलं. त्याचसोबत आता हा जबरदस्त डान्स पाहता इशान भल्याभल्या कलाकारांना टक्कर देणार हे नक्की.
येत्या २० एप्रिल रोजी त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये मालविका मोहनन त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. इशान हा नीलिमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. तर शाहिद कपूर नीलिमा अजीमचा पहिला पती पंकज कपूर यांचा मुलगा आहे.