सध्या शाहरुख खान अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी आणि संपूर्ण ‘रईस’ टीमसोबत शाहरुखने रेल्वेतून प्रवास केला होता. स्टेशनवर त्याला बघायला त्याच्या चाहत्यांची एकच गर्दी झाली, ज्यात एकाचा मृत्यूही झाला. तर दुसरीकडे राकेश रोशन यांनीही काबिल या सिनेमाच्या तुलनेत ‘रईस’ सिनेमाला जास्त स्क्रीन मिळवण्याचाही आरोप केला होता. या सगळ्या कारणांमुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच किंग खान वादात अडकला आहे.

नुकताच त्याच्यावर अजून एक आरोप करण्यात आला आहे. सलग तीन सिनेमात मुस्लिम व्यक्तिरेखा साकारण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. हा ट्रेण्ड खरे तर करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमापासून सुरु झाला. या सिनेमात शाहरुखने ऐश्वर्या राय- बच्चन हिच्या पूर्वाश्रमीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात त्याचे नाव ताहिर तलियार खान असे होते. यानंतर ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातही त्याने डॉक्टर जहांगीर खान ही व्यक्तिरेखा साकारली होती. आलिया भट्टसोबतच्या या सिनेमाची अनेकांनी प्रशंसा केली होती.

आता २५ जानेवारीला शाहरुखचा ‘रईस’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला. यात किंग खानचे नाव रईस आलम असे आहे. असे असले तरी ‘फॅन’ या सिनेमात त्याच्या दोन्ही व्यक्तिरेखांची नावे ही हिंदूच होती. तसेच ‘हॅप्पी न्यू इयर’ आणि ‘दिलवाले’ या सिनेमातही त्याचे नाव हिंदूच होते.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, आताची पत्रकारिता ही कोणतीही सुचना देण्याऐवजी रंजक बातमी कशी मिळेल याकडे अधिक बघते.

या ब्लॉगमध्ये त्याने लिहिले की, मी कोणत्या सिनेमात किती वेळा मुस्लिम व्यक्तिरेखा साकारली ही माहिती तुम्ही देता. पण मला तर ऐ दिल है मुश्किल या सिनेमात माझ्या व्यक्तिरेखेचे नावही आठवत नाही. मी फक्त तिकडे दोन तासांसाठी गेलो होतो. काही दृश्यांच्या चित्रिकरणानंतर मीनंतर रणबीर, ऐश्वर्या, करणसोबत फक्त मस्तीच केली. सकाळी २ वाजता माझे चित्रिकरण संपले पण सकाळी ६ पर्यंत आम्ही पार्टी करत होतो. नंतर तिकडून मी लिस्बनलाही गेलो.