बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक सिलिब्रिटी जोडींनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता या नवीन वर्षातदेखील मलायका-अर्जुन, शिबानी दांडेकर-फरहान अख्तर या जोड्या लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील प्रियकर रोहन श्रेष्ठासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. तिच्या या लग्नाच्या चर्चांवर तिचे वडील शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शक्ती कूपर यांनी नुकतीच स्पॉटबॉयला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलगी श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे. ‘रोहन हा फॅमिली फ्रेंड आहे. त्याच्या वडिलांना मी गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत आहे. तो आम्हाला भेटण्यासाठी देखील घरी येतो. पण त्याने अजून माझ्याकडे लग्नासाठी श्रद्धाचा हात मागितलेला नाही’ असे शक्ती कपूर म्हणाले.

आणखी वाचा : ‘अनिरुद्ध देशमुख हरवला आहे, सापडल्यास संजनाशी संपर्क करा’, मालिकेवरील मजेशीर पोस्ट व्हायरल

पुढे ते म्हणाले, ‘आज काल मुलं त्यांच्या आयुष्याशी संबंधीत निर्णय स्वत: घेतात. जर मला श्रद्धाने येऊन सांगितले की तिने तिचा लाइफपार्टनर निवडला आहे तर मी ते तिच्या निर्णयाचा आदर करेन. मी त्यांना नकार का देइन? पण त्यांनी त्यांच्या करिअरवर देखील लक्ष केंद्रीत करायला हवे. लग्न करणे हा महत्वाचा निर्णय असतो. पण बऱ्याच वेळा लोक वेगळे होण्याचा निर्णय घेतात त्याने मला थोडा धक्का बसतो.’

रोहन श्रेष्ठा हा बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्यानेदेखील याच क्षेत्राची निवड केली आहे. रोहनने न्युयॉर्क अॅकॅडमी येथे आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे वडीलांप्रमाणेच रोहनदेखील बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफरपैकी एक आहे. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मॅगझीन, काही ब्रॅण्डसाठी त्याने काम केलं आहे. करीना कपूर खान,रणबीर कपूर, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांचे फोटोशूट केलं आहे.