स्टार किड्स पैकी एक म्हणजे अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर. शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसल तरी त्यासाठी तिची जोरदार तयारी सुरु आहे. शनाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून बोल्ड फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. बॉलिवूड पदार्पणसाठी शनाया डान्सचे धडे देखील घेत आहे. तिच्या या डान्सचे व्हिडीओ ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच शनायाने तिच्या बेली डान्सचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

शनायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा बेली डान्सच्या सेशनचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती तिच्या कोरिओग्राफरसोबत अफलातून बेली डान्स करताना दिसतेय. “आम्ही बेस्ट संजना मुठरेजाकडून अशी कोरिओग्राफी शिकतो.” असं कॅप्शन शनायाने या व्हिडीओला दिलंय. या व्हिडीओतील शनायाच्या डान्स मूव्हस् पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर लाईकस् आणि कमेंटचा वर्षाव सुरु आहे. तर अनेक सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटी किड्सनी शनायाच्या डान्सवर कमेंट केल्या आहेत.

हे देखील वाचा: कंगना रणौतच्या टीममध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एण्ट्री, ‘टीकू वेड्स शेरू’सिनेमात मुख्य भूमिकेत

शनायाच्या मैत्रिणी असलेल्या सुहाना खान आणि बिग बींची नात नव्या नवेली नंदाने देखील शनायाच्या डान्स व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. यात नव्याच्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “हे पाहून माझ्या पोटात दुखू लागलं” अशी हटके कमेंट नव्याने केलीय. तर सुहाना खानने देखील एक इमोजी देत शनायाच्या डान्सला पसंती दिलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शनाया बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठी सज्ज झालीय. धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनायाने करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन जॉइन केलंय. शनायाने सोशल मीडियावरू मार्च महिन्यात याची घोषणा केली होती.