बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल सिनेप्रेमींमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. पण, त्याचसोबत काही स्तरांतून चित्रपटाला विरोधही केला जातोय. काही दिवसांपूर्वीच राजपूत करणी सेना आणि राजपूतांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेने ‘पद्मावती’ चित्रपटाचे पोस्टर जाळले होते. तसेच, ‘पद्मावती’ लूकमधील दीपिकाच्या पोस्टरची रांगोळीही विस्कटण्यात आली होती. यावर नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपले मत व्यक्त केले.

वाचा : ‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली ‘ती’ अभिनेत्री आठवते का?

‘पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ने शर्मिला यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यावेळी त्यांना चित्रपटासोबत वाद जोडल्यास त्याला किती फायदा होतो? असा सवाल करण्यात आला. त्यावर शर्मिला म्हणाल्या की, अशा वादांमुळे फार क्वचितच चित्रपटाला फायदा होतो. अनेकदा यामुळे चित्रपटांचे नुकसान होते. जेव्हा त्या लोकांनी ‘पद्मावती’च्या सेटची तोडफोट केली तेव्हा चित्रपटाचा निर्मिती खर्च वाढला. इतकेच नव्हे तर रांगोळीही विस्कटण्यात आली. या सगळ्याचा चित्रपटाला कसा फायदा होणार?

वाचा : राणा डग्गुबत्तीचे हे झाले तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही आमची परवानगी घेतली नाहीत तर आम्ही तुमचे चित्रपटगृह जाळू अशी त्या व्यक्तींनी (करणी सेना आणि संस्था) चित्रपटगृहाच्या मालकांना धमकी दिलेली आहे. या सगळ्यांचा केवळ ‘पद्मावती’लाच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला खूप मोठा फटका बसू शकतो. प्रत्येक चित्रपटासाठी प्रदर्शनापासूनचे पहिले तीन दिवस फार महत्त्वाचे असतात. त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होतो. पण, प्रेक्षक आधीच घाबरलेले असल्यामुळे ते सुरुवातीचे दोन दिवस चित्रपटगृहांकडे वळणारच नाहीत. पहिले दोन दिवस शांततेत जाऊ देत मग आपण चित्रपट पाहायला जाऊ, असा प्रेक्षक विचार करतील असेही त्या म्हणाल्या.