दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त यांची गुरुवारी दुबईत भेट झाली. त्यांच्या या भेटीचे फोटो खुद्द शत्रुघ्न यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

वाचा : ‘नवाजुद्दीन आमचा साधाभोळा’

त्रिशालासोबतच्या काही सुंदर फोटोंना शेअर करत शत्रुघ्न यांनी लिहिलं की, ‘माझे मित्र दिवंगत सुनिल दत्त यांची नात आणि प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला हिला दुबईत भेटण्याची संधी मिळाली. माझी मुलगी सोनाक्षीची ती चाहती असल्याचे अगदी प्रांजळपणे तिने मला सांगितले.’ या ट्विटसह त्यांनी त्रिशालाला आशीर्वादसुद्धा दिले. शत्रुघ्न आणि त्रिशालाच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अगदी कमी वेळातच ते ट्रेण्ड लिस्टमध्ये अग्रस्थानी आल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले.

वाचा : पत्नीसाठी कधी सॅनिटरी पॅड आणता का?- अक्षय कुमार

दरम्यान, केवळ त्रिशालाच नाही तर संजूबाबा, त्याची पत्नी मान्यता आणि जुळी मुलं शाहरान – इकरा हेसुद्धा दुबईला गेले होते. या संपूर्ण कुटुंबाने तेथे एकत्र नववर्षाचे स्वागत केले. सुट्ट्यांचा आनंद घेत असलेल्या या दत्त कुटुंबाचे काही फोटो त्रिशालाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आपल्या वडिलांसोबत शेअर केलेल्या फोटोवर त्रिशालाने, ‘लहान मुलांप्रमाणे खेळतात, मित्राप्रमाणे सल्ला देतात, बॉडीगार्डप्रमाणे सुरक्षा करतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते’, असे कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळते. आपल्या कुटुंबासह एकत्र काही क्षण व्यथित केल्यानंतर आता संजूबाबा ‘तोरबाझ’ आणि ‘साहेब, बिवी और गँगस्टर ३’ या चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

https://www.instagram.com/trishaladutt/

https://www.instagram.com/p/BdXKLOfDs4n/

Story img Loader