छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थवर अंत्यसंस्कार पार पडले आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला धक्का बसला आहे. तर ओशिवारा स्मशानभूमित त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहे.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी शेहनाज ओशिवारा स्मशानभूमित पोहोचली होती. यावेळी शेहनाजसोबत तिचा भाऊ होता. शेहनाज तिच्या गाडीत रडताना दिसली. तिचे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहे. शेहनाजला सिद्धार्थच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील ओशिवारा स्मशानभूमित हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शेहनाज व्यतिरिक्त सिद्धार्थच्या संपूर्ण कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. तर या आधी शेहनाजच्या वडिलांनी ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतला आहे. तर सिद्धार्थ आता या जगात नाही यावर शेहनाजला विश्वास होत नाही आहे.

Story img Loader