आपल्या हटके स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या लूकसाठी चर्चेत असते. केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारे बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लूकसाठी नेहमीच नावाजले जातात. त्यात शिल्पा तर तिच्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहेच. टेलिव्हिजनवर ‘सुपर डान्सर्स’ या रिअॅलिटी शोमध्ये ती सध्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय आणि या शोमधील तिचा हटके अंदाज पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
मोनिषा जयसिंगने डिझाइन केलेल्या या साध्या फिकट गुलाबी रंगाच्या साडीला एक अनोखा ट्विस्ट दिलेला आहे. कमरेवरील चंदेरी रंगाचा पट्टा त्याची अधिक शोभा वाढवतो आहे. त्यासोबतच डायमंड रिंग आणि ब्रेसलेट, गळ्यात ब्लॅक अँड व्हाइट चोकरमुळे या साडीला एक वेगळाच लूक मिळाला आहे. शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोला दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
Naga Chaitanya Samantha Ruth Prabhu wedding PHOTOS : गोव्यात नागा चैतन्य-समंथाचा विवाह संपन्न
ग्लॅमरस शिल्पाचा एअरपोर्ट लूक असो, पार्टी लूक असो किंवा पारंपरिक लूक तिच्या स्टाइल स्टेटमेंटची चर्चा नेहमीच होते. काही दिवसांपूर्वी दुबईहून मुंबईला परतल्यानंतर एअरपोर्टवरील तिच्या लूकची सर्वत्र चर्चा झाली होती. यामागे विशेष कारण म्हणजे त्यावेळी तिने घातलेला स्कार्फ. दिसायला अगदी साधा असा लुई व्हाईटन ब्रॅण्डच्या त्या स्कार्फची किंमत तब्बल २१ हजार रुपये इतकी होती.