अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी (१९ जुलै) मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठही बरीच चर्चेत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अजून ही झाडाझडती सुरूच ठेवली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते . तिची चौकशी जवळजवळ  ७-८ तास सुरू होती. शिल्पा नंतर आता क्राइम ब्रांचने अजून ३ संशयित व्यक्तिंना चौकशीसाठी नोटिस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांत अभिनेत्री आणि दिग्दर्शक गहना वश‍िष्ठच्या नावाचा पण समावेश आहे.

मुंबई पोलिसांनी गहना वशिष्ठला चौकशीसाठी नोटिस पाठवली असून प्रॉपर्टी सेल ऑफिस मध्ये बोलावण्यात आले आहे. गहनाला पोलिसांची ही नोटिस मिळाली आहे. गहना सध्या भोपाळमध्ये असून ती लवकरात लवकर मुंबईत येण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने पोलिसाना सांगितलं आहे. गहना आता पर्यन्त नेहेमीच राज आणि शिल्पाच्या सपोर्टमध्ये बोलत आली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की राज कुंद्रा पोर्न नाही तर बोल्ड आणि एरॉट‍िक चित्रपट बनवतो. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की “मला कळत नाही, तुम्ही ज्या पोर्न कंटेंट बद्दल बोलत आहात ते पोर्न नसून बोल्ड आणि एरॉटिक फिल्म्स आहेत .जे पोर्नच्या सदरात मोडत नाहीत.”

दरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृतपणे स्पष्ट केलं होत की तिचा नवरा एॅप वर कोणत्या ही प्रकारचे अश्लील चित्रपट बनवत नाही. तिच्या या विधानाला गहनाने देखील तिला सपोर्ट केला होता. तिने सांगितलं की शिल्पा बरोबर मी सहमत आहे. हॉटशॉट एॅपवर अश्लील कंटेंट अपलोड करत नाही. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला २७ जुलैपर्यन्त न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून आता पोलीस प्रत्येक बाजू पडताळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज कुंद्रासोबत अजून ११ आरोपी या प्रकरणात सामील असल्याची माहिती समोर आली आहे. यात समिन खान, प्रतिभा नलावड़े, मोनू जोशी, भानु सूर्यम ठाकुर, मोहम्मद सैफी, वंदना तिवारी (गहना वश‍िष्ठ), उमेश कामत, दिपांकर खासनविस, तनवीर हाशमी रायन जॉन थोरपे ही काही नावे आहेत.