देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळी आणि भांग यांचे एक अनोखे समिकरण असल्याचे म्हटले जाते. देशभरात अनेक ठिकाणी होळीच्या निमित्ताने भांगेचे सेवन केले जाते. भांगेचे सेवन केल्यानंतर एक प्रकारची नशा चढते, आणि या नशेच्या धुंदीत लोक चित्रविचित्र प्रकारे नाचू लागतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाबतीत झाला आहे. भांगेच्या नशेत नागिन डान्स करणाऱ्या शिल्पाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
The 2 sips of bhaaang effect!!! Hahaha @rohiniyer @officialshilpashetty #HoliWeekend #happyholi
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्या देण्यासाठी त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा हनी सिंगच्या ‘नागिण’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. “दोन घोट भांग प्यायल्याचा परिणाम…” असे स्टेटस या व्हिडीओवर राज कुंद्राने लिहिले आहे.
शिल्पाचा हा ‘नागिण’ डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.