अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच राजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राजने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत राजने त्याचे एडिटींग स्किल्स दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ ‘टायटॅनिक’ या हॉलिवूड चित्रपटातील एका क्लिपचा आहे. राजने चित्रपटातील जॅक म्हणजेच लिओनार्डो दीकॅप्रिओ आणि रोझ म्हणजे केट विन्स्लेटच्या जागी त्याचा आणि शिल्पाचा चेहरा एडिट करून लावला आहे. एवढंच नाही तर बॅकग्राऊंडला दिलजीत सिंगचं गाणं देखील ऐकू येतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत “टायटॅनिकचं ते पंजाबी जोडपं परत आलं आहे! ते पंजाबी होते याचा पुरावा म्हणजे…तिने डायमंडची अंगठी समुद्रात फेकली! जट दा प्यार गोरीये”, अशा आशयाचे कॅप्शन देत राजने तो व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा; कॅन्सरशी लढा देणारे नट्टू काका झाले भावूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाला,”पंजाबी लोकांचा टायटॅनिक”. तर दुसरा म्हणाला, “राजकुंद्राचा टायटॅनिक”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे आहे.

Story img Loader