बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या लूक्त आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, या वेळी शिल्पा पती राज कुंद्रामुळे चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पाला पती राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र, शिल्पाने तो फ्लॅट विकला.

राज कुंद्राने २०१० मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलीफाच्या १९ व्या फ्लोअर वर ५० कोटींचा एक फ्लॅट शिल्पाला भेट म्हणून दिला होता. मात्र, काही दिवसांनी शिल्पाने तो फ्लॅट विकला. या मागचं कारण म्हणजे तो फ्लॅट लहान होता आणि त्या फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नव्हत्या. सोबतच शिल्पा आणि राज यांचा मुलगा विवानला मोकळ्या जागेत रहायलं आवडतं आणि फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नसल्याने त्याला त्रास व्हायचा, म्हणून शिल्पाने हा फ्लॅट विकला.

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता

आणखी वाचा : अटक राज कुंद्राला, सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये मात्र शिल्पा शेट्टी

शिल्पाचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. बई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.