अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडे देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे यंदा देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरवर्षी शिल्पा लालाबागच्या राजाची प्रतिकृती स्थापन करते. ही परंपरा तिने यंदा देखील कायम ठेवली. नुकतेच शिल्पाने मुलगा वियान आणि मुलगी समिषासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात शिल्पा तिच्या मुलांसोबत आनंद साजरा करताना दिसतेय.

शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर गणेश पुजनाचचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. या फोटो आणि व्हिडीओवर मात्र अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत शिल्पाला ट्रोल केलंय. शिल्पाचा पती राज कुंद्राला १९ जुलैला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्यानंतर त्याची रवानगी न्यायलयिन कोठडीत करण्यात आली आहे. अद्याप राज कुंद्रा अटकेतच आहे. अशातही शिल्पा गणेशोत्सव साजरा करत असताना आनंदात दिसत असल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलंय.

हे देखील वाचा: तैमूर करतोय गणपती बाप्पाची पूजा; करीनाने फोटो शेअर करत दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

शिल्पा शेट्टीच्या या फोटोंवर कमेंट करत एक युजर म्हणाला, “गणपती बाप्पा कुंद्राजींना देखील सद्बुद्धी द्या.” तर दुसरा युजर म्हणाला, “राज कुंद्रा कुठे गेला फिल्म बनवायला”, आणखी एक युजर म्हणाला, “मुलाचे बाबा दिसत नाहीत शिल्पा काकू”. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत शिल्पाला राज कुंद्रा कुठे आहे विचारत निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा: ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार

shilpa-shetty-troll-ganpati
(Photo-instagram@theshilpashetty)

शिल्पा शेट्टी गणेश पुजनाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हंटलंय, “दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आमचे गणू राजा आमच्या सोबत आहेत तर प्रत्येत संकटावर मात आहे.” असं म्हणत शिल्पाने सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र शिल्पा शेट्टीला देखील शुभेच्छा देत या कठीण काळात ती मुलांसोबत खंबीरपणे उभी असल्याचं म्हणत तिचं कौतुक केलंय.

Story img Loader