बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच पती राज कुंद्रा आणि मुलगा विवान यांच्यासोबत दुबईत सुट्टयांचा आनंद घेऊन भारतात परतली आहे. दुबईवरून परत येत असताना विमानतळावरील तिचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारे बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लूकसाठी नेहमीच नावाजले जातात. त्यात शिल्पा शेट्टी तर तिच्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहेच. बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लूकचा ट्रेंडची चलती आहे. त्यामुळे सेलिब्रिटी कुठेही बाहेरगावी जात असो किंवा तेथून परत येत असो, त्यांच्यावर फोटोग्राफर्सच्या नजरा नेहमीच खिळलेल्या असतात. त्यामुळे दुबईतून मुंबईत परतलेल्या शिल्पाचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांनी विमानतळावर गर्दी केली होती. यावेळी शिल्पाने हेलेन बर्मन लंडन ब्रॅण्डचे पांढऱ्या रंगाचे जॅकेट, निळ्या रंगाची डेनिम घातली होती आणि तिच्या हातात हेरेम्सची सुंदर बॅगही होती. यावेळी शिल्पाच्या गळ्यातील स्कार्फने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, या स्कार्फची किंमत ऐकून अनेकांना भोवळ आली.

वाचा : ..आणि आजींनी तिच्यासोबत सेल्फी काढला

हा स्कार्फ दिसायला साधारण असला तरी त्याची किंमत डोळे विस्फारायला लावणारी आहे. लुई व्हाईटन ब्रॅण्डच्या या स्कार्फची किंमत तब्बल २१ हजार रुपये इतकी आहे. यावरून, कलाकारांच्या आवडीनिवडी किती महाग असतात याचा पुरेपूर अंदाज येतो.

वाचा : VIDEO मद्यधुंद अवस्थेत मोदींविरोधात बरळला हा अभिनेता

काही दिवसांपूर्वीच शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ काढून टाकण्याची वेळ तिच्यावर आली होती. तिने चिंपाजीसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या चिंपाजीचे नाव तिने ‘प्रिन्सेस’ असे ठेवले होते. व्हिडिओमध्ये चिंपांजी शिल्पाकडे पाहून हसताना, तिला किस करताना स्पष्ट दिसत होते. मात्र, शिल्पाच्या चाहत्यांना तो व्हिडिओ फारसा आवडला नाही. या व्हिडिओमध्ये चिंपाजी तिच्याबरोबर हसत होता किंवा तिला किस करत होता ते प्रशिक्षकाच्या सांगण्यावरुन. त्याच्याकडून सर्व गोष्टी जबरदस्तीने करून घेतल्या जात होत्या. त्यामुळे प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याच्यारावरून युजर्सनी शिल्पाला खडेबोल सुनावले होते. तिच्या व्हिडिओचे समर्थन करणारी एकही कमेंट न आल्यामुळे नाईलाजाने शिल्पाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.