‘बिग बॉस ११’ची विजेती आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असलेल्या शिल्पाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पॉर्न व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर ती स्वत:च ट्रोल झाली. बिग बॉसमधील तिची प्रतिस्पर्धी आणि अभिनेत्री हिना खानने तिला खडेबोल सुनावले असून नेटकऱ्यांनीही शिल्पाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
खरंतर बिग बॉस ११मध्ये शिल्पा आणि तिचा सहकारी स्पर्धक विकास गुप्ता यांच्यातल्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. त्यावेळीच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये शिल्पासारखी दिसणारी एक मुलगी आणि विकास यांच्यातील प्रणयदृश्ये होती. आपली बदनामी करण्यासाठी विकासने तो व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यानंतर नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये तिनं पोर्नोग्राफिक साइटची लिंक पोस्ट करत ती मुलगी मी नसल्याचं म्हटलं आहे. ‘हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल. ज्यांना कोणताच कामधंदा नसतो, ते इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. हा तो खरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मी असल्याचं म्हटलं जात होतं,’ असं ट्विट तिनं केलं.
Sad..anyone’s fans or regular trolls may get away by saying anything on SM but as a public figure we get a power to be able to reach to millions with just one tweet and at least we should be very careful n responsible. Specially in these times, real life is not a reality show ! https://t.co/T4mro52L5t
— Hina Khan (@eyehinakhan) April 21, 2018
Also how do u or any of us can prove that d woman in the video was aware tht she was going to be showcased on any porn sites ?This is heights of irresponsibility! As u claim being a victim of such acts u shud hav never done this!I don’t care what fans do or say but THIS IS WRONG! https://t.co/RVTqfi9D1Y
— ROCKY (@JJROCKXX) April 21, 2018
VIDEO : व्हॉलीबॉल खेळताय?, तर खिलाडी कुमार होऊ शकतो तुमच्या संघात सामील
स्पष्टीकरण देण्यासाठी शिल्पाने सोशल मीडियावर पॉर्नोग्राफिक साइटच पोस्ट केल्याने नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल केलं जात असतानाच अभिनेत्री हिना खाननंही तिला खडेबोल सुनावले. हिनासोबतच तिचा प्रियकर रॉकीनंही शिल्पावर हल्ला चढवला आहे. ‘ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सेलिब्रिटींना जबाबदारीनं वागणं गरजेचं असतं. त्यांचा एक ट्विट लाखो लोकांपर्यंत पोहोचतं, अशा वेळी त्यांनी सावधानता बाळगणं आवश्यक असतं,’ असं म्हणत हिनाने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला. दुसरीकडे रॉकीनं ट्विट केलं की, ‘शिल्पा, तुझ्याबाबत जे घडलं ते दुर्दैवी आहे. तुला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, तू जो व्हिडिओ शेअर केला आहेस, तो संबंधित महिलेचा असल्याचा पुरावा तुझ्याकडे आहे का? एक जबाबदार सेलिब्रिटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्नसाइट पोस्ट करण्याऐवजी तू कायद्याचा आधार का नाही घेतला?’