सध्या महाराष्ट्रतील सर्वांचं लाडकं कपल म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असलेल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असतात. नुकताच शिवने वीणाचा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वीणाचा वाढदिवस स्पेशल व्हावा यासाठी शिव तिला घेऊन क्रूझवर गेला होता. तेथे त्याने वीणासाठी खास केक मागवला होता. त्या केकवर ‘Happy Birthday Rani’ असे लिहिले होते. शिवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वीणाचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो वीणासोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत त्याने “Happy birthday sweet heart.. Bekhayali Mein Bhi Tera hi khayal Aaye” असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
Happy birthday sweet heart @veenie.j Bekhayali Mein Bhi Tera hi khayal Aaye @veenie.j
बिग बॉस मराठी पर्व २ मध्ये शिव आणि वीणाची ओळख झाली होती. त्या दोघांच्या मैत्रीचे किस्से त्यावेळी प्रचंड चर्चेत होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्यात हे नातं कायम राहणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण एकंदरीत शिव आणि वीणा सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंवरुन आणि एकत्र फिरता पाहून त्यांच्यात नातं कायम असल्याचे दिसत आहे.