टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका ‘सीआयडी’ CID ला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २८ जानेवारी १९९८ मध्ये या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. यातील प्रत्येक भूमिका तुफान गाजलेली. एसीपी प्रद्युम्न, सीनियर इन्स्पेक्टर दया, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत या सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सोनी वाहिनीवरील या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न’. मालिकेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्य भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांनी काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडच्या एपिसोडविषयीही सांगितले.
‘मालिकेसंदर्भातील अविस्मरणीय गोष्ट म्हणजे २००४ मध्ये १११ मिनिटांसाठी शूट केलेला एपिसोड. ७ नोव्हेंबर २००४ रोजी हा एपिसोड प्रसारित झाला होता. या एपिसोडच्या सुरुवातपासून शेवटचा सीन एकाच शॉटमध्ये चित्रीत करण्यात आला होता. १११ मिनीटांचे सीन एकाच शॉटमध्ये चित्रीत झाले होते,’ असे ते म्हणाले. सीआयडीच्या या विशेष एपिसोडची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.
https://www.instagram.com/p/BeNO_aIBmfJ/
एखाद्या मालिकेने विक्रम रचणे ही खूप महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सिंगल टेकमध्ये एपिसोड चित्रीत करण्यासाठी संपूर्ण टीमने सहा दिवस सराव केला होता.
वाचा : जान्हवी श्रीदेवीच्या पावलांवर पाऊल ठेवणार नाही- बोनी कपूर
टेलिव्हिजनवर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली ही एकमेव मालिका असेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या या मालिकेने इतिहास रचला असे म्हणायला हरकत नाही.