बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रद्धाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धा तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्याचे दिसते. त्यानंतर एक वृद्ध व्यक्ती तिच्याकडे मदत मागताना दिसते. तिच्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्यात व्यस्त असलेली श्रद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. शेवटी त्या वृद्ध व्यक्तीला श्रद्धा नमस्करा करते आणि ते तिथून निघून जातात. त्यानंतर श्रद्धा तिच्या गाडीत बसून निघून जाते.

आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला,’एवढे श्रीमंत लोक आहेत गरीबाला मदत करू शकत नाही.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला लाज वाटली पाहिजे, तू त्याची मदत केली नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘इतके कोटी रूपये कमतात, पण त्या काकांना एक पार्सल देऊ शकत नाही. पैसे नाही पण खायला काही देऊ शकतात ना.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘एवढ्या मोठ्या बॅगेचा काय फायदा जर तुम्ही १० रुपये देऊ शकत नाही,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी श्रद्धाला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताजी जेठालाल नव्हे तर नऊ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ अभिनेत्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये?

श्रद्धाचा ‘बागी ३’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रद्धा टायगर श्रॉफसोबत दिसली. आता श्रद्धा लवकरच ‘नागिन’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यानंतर श्रद्धा लव रंजन दिग्दर्शित ‘अनाम’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.