त्याची देहयष्टी, त्याची स्टाईल, त्याचा अभिनय, त्याच्या प्रत्येक गोष्टीचे लाखो चाहते आहेत. त्याने जणू प्रेक्षकांना भुरळच घातली आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आहे. ‘बाहुबली’ चित्रपट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या डार्लिंग प्रभासच्या प्रेमात त्याचे सहकलाकारसुद्धा पडल्यास नवल वाटायचे कारण नाही. त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या श्रद्धाने त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा राहिला, याबाबत चाहत्यांना सांगितले.

बुधवारी ट्विटर चॅटच्या माध्यमातून श्रद्धाने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी प्रभाससोबत काम करतानाचा तिचा अनुभव कसा होता, असे एकाने विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, ‘प्रभास खरंच डार्लिंग आहे. मी भेटलेल्या सर्वांत चांगल्या व्यक्तींपैकी तो एक आहे. ‘
साहोच्या सेटवर प्रभास आणि श्रद्धाची चांगलीच मैत्री जमली आहे. प्रभासला हिंदी भाषा फारशी येत नसल्याने श्रद्धा त्याला ती शिकण्यात मदत करत आहे तर प्रभाससुद्धा तिला तेलुगू भाषा शिकवत असल्याचे म्हटले जात आहे.