सर्वसाधारणपणे हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री आपल्या मादक अंदाजासाठी ओळखल्या जातात. परंतु गेल्या काही काळात मराठी अभिनेत्रींनी देखील आपल्या स्टाईलिश अंदाजाने खळबळ माजवली आहे. सई ताम्हणकर, मानसी नाईक, नेहा पेंडसे, स्मिता गोंदकर अशा अनेक अभिनेत्री आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करताना दिसत आहे. या यादीत आता श्वेता साळवे हिचे देखील नाव जोडले गेले आहे. तिने तर चक्क आपल्या पतीसोबत किसिंग करताना फोटो पोस्ट केला आहे.
अवश्य पाहा – मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना
अवश्य पाहा – Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप
श्वेताने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती पती हरमितचे चुंबन घेताना दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले बोल्ड फोटोज पोस्ट करत असते. या पार्श्वभूमीवर तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.
३५ वर्षीय श्वेता एक टीव्ही अभिनेत्री आहे. १९९८साली ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘किटी पार्टी’, ‘कहानी किसी रोज’, ‘कित्तू सब जानती है’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले. ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ‘झलक दिखलाजा’ या रिअॅलिटी शोमुळे श्वेताच्या जबरदस्त डान्सची देखील चर्चा होऊ लागली होती.