सध्या अनेक कलाकारांची मुलं सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहेत. मग यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांची नावे तर अग्रणी असतात. बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा मुलगा करण देओलही बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. पण त्याच्या सिनेमासाठी नेमकी अभिनेत्री कोण असणार हा मोठा प्रश्न होता. सुरुवातीला टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे नाव पुढे येत होते. त्यामुळे सनी देओलचा मुलगा आणि श्वेताची मुलगी एकत्र सिनमात दिसतील असे अनेकांना वाटले होते.

तानाजी गलगुंडेला जॅकपॉट, लवकरच दिसणार हिंदी टिव्ही शोमध्ये

पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पलकला सध्या या सिनेमात स्वारस्य दिसत नाही असेच वाटते. म्हणूनच की काय तिने या सिनेमाचे ऑडिशन द्यायला चक्क नकार दिला. पण तिने नेमकी का नकार दिला हे मात्र अजूनपर्यंत कळू शकले नाही. पण पलकच्या या नकारामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनते आहे हे मात्र खरं.

काही दिवसांपूर्वीच सनीपाजीचा मुलगा करण देओल याच्या आगामी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात पलक तिवारी मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरल्या होत्या. स्वतः सनीने पलकची निवड केल्याचे वृत्त होते. मात्र यावर आणखी चर्चा रंगणार तोच पलकने त्यास पूर्णविराम दिला आहे. तिने या सिनेमासाठी साधे ऑडिशन देण्यासही स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. सनी आणि करण हे दोघंही बाप लेक या सिनेमासाठी सध्या प्रचंड उत्साही आहेत. आपल्या मुलासाठी उत्तम अभिनेत्री शोधण्यासाठी सनीने आतापर्यंत तब्बल २०० मुलींचे ऑडिशनही घेतले आहेत. परंतु त्यातील एकही मुलगी सनीला करणची अभिनेत्री म्हणून पसंत आली नव्हती.

देव आनंद यांच्या भावासोबत ही अभिनेत्री होती लिव्ह इनमध्ये; निर्दयीपणे झाली होती तिची हत्या

शेवटी सनीची नजर पलकच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर गेली. पलकचे फोटो पाहताच सनी तिचा चाहता झाला. अधिक वेळ न दवडता त्याने लगेचच पलकला ऑडिशन देण्यासाठी बोलावले. आता सनी देओलसारखा सिनिअर अभिनेता ऑडिशनसाठी बोलवतोय तर कोणताही कलाकार धावत ऑडिशन द्यायला जाईल. पण पलकच्या बाबतीत असे काही झाले नाही. असे म्हटले जात आहे की, पलक आमिर खान याच्या ‘तारे जमीन पर’ सिनेमातून ओळख मिळालेला अभिनेता दर्शिल सफारी याच्यासोबत आपल्या सिनेकरिअरला सुरुवात करणार आहे. पलक दर्शिलबरोबर ‘क्वीकी’ या सिनेमात पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पलक तिवारीविषयी सांगायचे झाल्यास, ती सोशल मीडियावर फार सक्रीय असते. छोट्यात छोट्या गोष्टींचे फोटो ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. पलकचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. काही दिवसांपूर्वी पलकने एक फोटोशूटही केले होते. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.