‘डिप्रेशन’ हा शब्द अभिनयसृष्टीसाठी नवा नाही. काम मिळालं नाही, ब्रेक अप झालं, नात्यांमध्ये मतभेद निर्माण झाले की कलाकार मंडळी नैराश्यात जातात असं म्हटलं जातं. खरं तर असा दावा दीपिका पदुकोण, संजय दत्त, कतरिना कैफ, इलियाना डिक्रूज यांसारख्या अनेक कलाकारांनी केला आहे. थोडक्यात काय तर काही काळासाठी त्यांचं मानसिक स्थैर्य बिघडतं. परंतु कुठल्याही कारणासाठी नैराश्यात जाणं मला परवडणार नाही. असा आश्चर्यचकित करणारा खुलासा टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

मदर्स डेच्या निमित्ताने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत श्वेता म्हणाली, “संपुर्ण कुटुंबाचा आर्थिक कारभार माझ्या खांद्यावर आहे. मी काम केलं नाही तर माझं कुटुंब आर्थिक संकटात सापडेल. माझ्या मुलीची सर्व स्वप्न मला पुर्ण करायची आहेत. या पार्श्वभूमीवर डिप्रेशनमध्ये जाणं मला परवडणार नाही. ही अवस्था काय असते याचा अनुभव मी घेतला आहे. तो अनुभव पुन्हा घेण्याची इच्छा माझी नाही. कितीही निराशा हाती आली तरी मी हार मानत नाही. अपयश प्रत्येकाला येतं. तुमचं प्रत्येक स्वप्नं पुर्ण होईलच असं नाही. परंतु अशा परिस्थितीत प्रयत्न करणं हेच आपलं काम आहे. या अनुशंगाने मी विचार करते. त्यामुळे डिप्रेशनसारखा प्रकार माझ्या आसपाससुद्धा फिरकत नाही. असा अनुभव श्वेताने सांगितला.

सर्वाधिक वाचकपसंती – “तीन वर्ष मी लॉकडाउनमध्येच होतो”; रणदीप हुड्डाने सांगितला धक्कादायक अनुभव

श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून ती लोकप्रिय झाली होती. या मालिकेत तिने प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तिने ‘झलक दिखलाजा’, ‘परवरीश’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ यांसारख्या अनेक सुपरहिट शोमध्ये काम केले आहे.