छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्याची जवळची मैत्रिण शेहनाजला देखील धक्का बसला होता. सिद्धार्थच्या अंत्यविधीच्यावेळी शेहनाज कोलमडून गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्मशानभूमीत शेहनाज सतत सिद्धार्थचे नाव घेत रडत होती.

सुत्रांनी दिलेल्यावृत्तानुसार, सिद्धार्थला सर्वप्रथम ज्यांनी बेशुद्धवस्थेत पाहिले त्यापैकी शेहनाज एक आहे. तर सिद्धार्थला सकाळी ९.३० च्या सुमारास कूपर रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी कुटुंबासोबत शेहनाज सुद्धा तिथे होती. कूपर रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर सिद्धार्थला मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

आणखी वाचा : अनिल कपूरच्या धाकट्या मुलीचा बिकिनी लूक व्हायरल

तर ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शेहनाजचे वडील संतोक सिंह सुख म्हणाले की शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतला आहे. तर सिद्धार्थ आता या जगात नाही यावर शेहनाजला विश्वास होत नाही आहे. शेहनाजची रडून रडून खूप वाईट अवस्था आहे. आता मी काय करणार? मी कशी जगणार?, असे शेहनाज तिच्या वडिलांना म्हणाल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील भिडे गुरुजी आणि टप्पूमुळे चाहत्यांची चिंता वाढली

सिद्धार्थची आई सध्या वाईट अवस्थेत असलेल्या शेहनाजची काळजी घेत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या शेहनाज व्यवस्थित झोपत नाही. ती खातपित नाही. कोणाशी जास्त बोलत नाही. या परिस्थितीत तिला एकटीला सोडता येणार नाही. सिद्धार्थची आई या कठीण परिस्थितीत शेहनाजची काळजी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader