‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या नीरज पांडेच्या ‘अय्यारी’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, त्याचसोबत तो आणखी एका प्रोजेक्टवर काम करणार असल्याचे समजते. एका रिअल लाइफ हिरोच्या आयुष्यावरील चरित्रपटात तो दिसण्याची शक्यता आहे.

वाचा : राखी सावंतचे राम रहिमसोबत फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ लवकरच एका नव्या चित्रपटात दिसेल. हा चित्रपट १९९९ साली कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजते. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेरणादायी कथा सिद्धार्थला नेहमीच आवडतात. पहिल्यांदाच एका रिअल लाइफ हिरोच्या आयुष्यावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सिद्धार्थ खूप उत्सुक आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. मुख्य म्हणजे निर्माता, दिग्दर्शक किंवा लेखकाने चित्रपटासाठी सिद्धार्थची निवड केलेली नाही. तर, विक्रम यांच्या कुटुंबीयांना सिद्धार्थनेच ही भूमिका साकारावी असे वाटते. सिद्धार्थच्या हातात सध्या दोन चित्रपट आहेत.

विक्रम बत्रा यांच्यावर आधारित असलेला हा काही पहिला चित्रपट नसेल. याआधी २००३ साली आलेल्या ‘एलओसी कारगिल’ चित्रपटाची कथाही त्यांच्याभोवती फिरणारी होती.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’ पाहायचा आहे, मग २०१८ ची वाट पाहा!

सिद्धार्थच्या हातात सध्या दोन चित्रपट आहेत. अभय चोप्राचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘इत्तेफाक’ आणि दुसरा ‘अय्यारी’. सिद्धार्थसह मनोज वायपेयीचीसुद्धा भूमिका असलेला ‘अय्यारी’ पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल.