अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसलाय. ४० वर्षीय अभिनेता सिद्धार्थ ही अकाली एक्झिट पाहून त्याच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडकर देखील शोकाकुल झाले आहेत. सिद्धार्थ शुक्ला आपल्याला सोडून गेला आहे यावर अनेकांना विश्वासच बसत नाही. त्याच्या निधनानंतर सिद्धार्थ शुक्लाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. या ट्विटमध्ये त्याने मरणावर एक वाक्य लिहिलंय. हे ट्विट पाहून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याचं व्हायरल होत असलेलं ट्विट खूप जुनं आहे. सिद्धार्थ शुक्लाने २४ ऑक्टोंबर २०१७ मध्ये शेअर केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने मरणावर एक वाक्य लिहिलं आहे. यात त्याने लिहिलं की, “मरण हे माणसाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान नाही. सर्वात मोठं नुकसान तर तेव्हा होतं, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगायला लागतो आणि त्याचवेळी माणसाच्या आतल्या गोष्टी मरू लागतात.”

आणखी वाचा : Sidharth Shukla Last Call: मृत्यूपूर्वी सिद्धार्थचा ‘या’ अभिनेत्याला शेवटचा कॉल…

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने माणसाच्या मृत्यूबाबत त्याचे विचार पाहून चाहते मात्र पुरते भावूक झाले आहेत. सिद्धार्थचं हे ट्विट पाहून त्याच्या मनात नक्की कोणत्या विचारांनी घर केलं होतं, असा प्रश्न त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. सिद्धार्थने त्याच्या ट्विटमध्ये मृत्यूबाबत मांडलेले विचार पाहून त्याच्या हासऱ्या चेहऱ्यामागचे भाव शोधण्यचा प्रयत्न त्याचे चाहते करत आहेत.

सिद्धार्थ शुक्लाचं चार वर्षापूर्वीचं हे ट्विट शेअर करत चाहते त्यावर रिप्लास करत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसून येत आहेत. “आयुष्यावर भरभरुन प्रेम करा, प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्या” असे कमेंट्स करत चाहते व्यक्त होत आहेत. काही चाहत्यांनी हे ट्विट वाचून सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पिली आहे. तसंच त्याच्या निधानावर शोक देखील व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : Siddharth Shukla Death: ‘बालिका वधु’मधील जोडीची कायमची एक्झिट; आनंदीची आत्महत्या तर ‘शिव’ला हार्टअटॅक

सिद्धार्थ शुक्लाच्या निधानापूर्वी त्याच्यासोबत नक्की काय घडलं होतं, याबाबत प्रत्येकाच्याच मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्री त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर काही गोळ्या घेऊन तो झोपला होता. पण मध्यरात्री तो झोपेतून उठला होता, असंही बोललं जातंय. सकाळी त्याच्या कोणतीही हाचलाच होत नसल्याचं पाहून त्याचा कूपर रूग्णालयात नेण्यात आलं होतं. पण रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. कूपर रूग्णालयात आणल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. यावेळी झोपेतच हृदयवविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे इस्पितळातून सांगण्यात आले.