बॉलिवूडचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंगच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर कधीही न पाहिलेल्या अशा हटके भूमिकेत त्याच्या चाहत्यांना दिसणार होता. मात्र, चित्रपटाभोवती असलेला वादाचा गराडा काही संपत नसल्यामुळे आता ‘पद्मावती’ प्रदर्शित होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असले तरी रणवीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच हा अभिनेता तुम्हाला आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Inside Photos : मनिषच्या बर्थडेला पोहचली मित्रांची टोळी

करण जोहरने बुधवारी संध्याकाळी ट्विटवर उद्या सकाळी एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून करण नक्की कसली घोषणा करणार आहे याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज सकाळी त्याने ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर ट्विट केला. या पोस्टरवर पोलिसाच्या वेशातील पिळदार मिशा असलेला अतरंगी रणवीर पाहावयास मिळतो. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ नंतर करणचा हा २०१८मधील दुसरा मोठा चित्रपट असेल.

KaalaKaandi Trailer: सैफ अली खानच्या या सिनेमात मिळेल ‘डार्क कॉमेडी’चा डोस

‘सिम्बा’ या अॅक्शनपटासाठी करणने ‘गोलमाल अगेन’ फेम दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्याशी हातमिळवणी केली आहे. पुढच्या वर्षी २८ डिसेंबरला ‘सिम्बा’ प्रदर्शित होईल. रणवीरचा नेहमीचाच उत्साह या पोस्टरमध्येही दिसतो. या चित्रपटातून तो ‘संग्राम भालेराव’ म्हणजेच ‘सिम्बा’ची भूमिका तो साकारणार आहे.