गायिका प्रियांका बर्वे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच प्रियांकाने मुलासोबत गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहे.

प्रियांकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबत गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओध्ये प्रियांका गाणे गात आहे आणि तिचे बाळ तिच्या मागे गुणगुण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा- खऱ्या आई-वडिलांविषयी जाऊण घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..

प्रियांका आणि तिचा पती सारंग कुलकर्णीने २० ऑगस्ट रोजी आई-बाबा झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर त्यांच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रियांकाने देखील सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने आनंदी गोपाळ, रमा-माधव, पानीपत चित्रपटांतील गाणी गायली आहेत.