प्रसिद्ध गायिका तुलसी कुमारने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्या आयुष्यातील ही सर्वाधिक आनंदाची बातमी तुलसीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली. मुलाचे नाव शिवाय ठेवल्याचेही तिने सांगितले.

TOP 10 NEWS वाचा : विरुष्काच्या रिसेप्शनपासून भगवद् गीता वाचणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्यापर्यंत..

आपल्या मुलाच्या जन्माची बातमी ट्विटरवर शेअर करत तुलसीने लिहिलं की, ‘शिवायचे आम्ही या जगात स्वागत करतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद.’ ‘हमको दीवाना कर गए’, ‘तू ही रब तू ही दुआ’, ‘तुम जो आए जिंदगी में बात बन गई’, ‘सोच ना सके’ यासारखी एकापेक्षा एक सरस गाणी गाणाऱ्या तुलसीने नोव्हेंबरमध्ये ती गरोदर असल्याचे वृत्त जाहीर केले. टी-सीरिज कंपनीचे मालक दिवंगत गुलश कुमार यांची मुलगी असलेल्या तुलसीने जयपूरमधील व्यावसायिक हितेश राल्हन याच्यासोबत २०१५ मध्ये लग्न केले.

वाचा : नर्गिस यांच्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार ऐश्वर्या?

गरोदरपणाच्या काळात स्त्री अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरी जात असते. त्यामुळे त्यादरम्यान ती अगदी संवेदनशील होते. याविषयी एका मुलाखतीत तुलसी म्हणालेली की, ‘ही खूपच छान भावना आहे. माझ्या शरिरासोबतच मानसिक बदलही मला जाणवत आहेत. पण, तुमच्या शरिरात एक नवीन जीव वाढत असतो ही भावना काही वेगळीच असते.’ गेल्याच महिन्यात या गायिकेने मॅटर्निटी फोटोशूट केले होते. गायिका असलेल्या तुलसीने तिच्या फोटोशूटलाही म्युझिकल टच दिला होता.