बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या तिच्या आगामी ‘पॅडमॅन’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सोमवारी खिलाडी कुमार दिल्ली विद्यापीठात सिनेमाचे प्रमोशन करायला गेला होता. यावेळी त्याने वुमन मॅरेथॉनचे समर्थन केले. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो एबीव्हीपीचा झेंडा फडकवताना दिसत आहे. या फोटोला अक्षयने महिला सशक्तीकरणासाठी पुढे नेत असून टॅक्स फ्री सॅनिटरी नॅपकीनसाठी धावत आहेत, असे कॅप्शन दिले आहे.

अक्षयच्या अनेक चाहत्यांना मात्र त्याची ही पोस्ट फारशी आवडली नाही. काहींना त्याची ही पोस्ट आवडली तर काहींनी अक्षयला राजकारणातील प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच चर्चेचा विषय ठरते. त्यात अक्षयने त्यांचा झेंडा फडकावतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्याला ट्रोलही केले जात आहे. अक्षयचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘पद्मावत’ सिनेमासोबतच २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या ‘पॅडमॅन’ सिनेमात ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणारे अरुणाचलम मुरुगानंथम यांची कथा दाखवण्यात आली आहे.

‘द लेजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ या ट्विंकलच्या पुस्तकातील एका भागावर हा सिनेमा आधारित आहे. अक्षयसोबतच यामध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत झळकणार आहेत. पुढच्या वर्षी २६ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

नोबल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजईने अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ सिनेमाला समर्थन दर्शवले आहे. मलालाने ‘द ऑक्सफर्ड युनियन’ दरम्यान ट्विंकल खन्नाची भेट घेतली. यावेळी मलाला म्हणाली की, ‘मी ‘पॅडमॅन’ सिनेमाला पाहायला फार उत्सुक आहे. हा सिनेमा एक चांगला संदेश देतो.’