‘बिग बॉस’ फेम सोफिया हयात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका नेटकऱ्याने सोफिया हयातवर खळबळजनक आरोप केले आहेत. या ट्रोलरचा दावा आहे की सोफिया हयातचे अभिनेता अभिनव शुक्लासोबत शारीरिक संबंध आहेत. एवढेच नाही तर या नेटकऱ्यांने सोफियाला ‘सस्ती पॉर्न स्टार’ म्हटले आहे, आणि लवकरच तिचे निधन झाले पाहिजे असे नेटकरी म्हणाला आहे. या ट्रोलरबद्दल सांगण्यासाठी सोफियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एवढंच नाही तर त्याने केलेल्या मेसेजेचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे.
सोफियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं होतं. त्यासोबत तिने त्या ट्रोलरच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सोफियाने या व्हिडीओत सांगितलं की ती अभिनवला ओळखतही नाही, त्यामुळे ‘वन नाईट स्टॅंड’ किंवा कोणत्या ही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यात तिने हे देखील सांगितलं की असे आरोप करणारी ही एक स्त्री होती.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘दोन मुलांची आई असल्याने मला काम मिळतं नाही..’, अभिनेत्रीने केला खुलासा
View this post on Instagram
आणखी वाचा : चक्क बाथ्रोबमध्ये गोवा-मुंबई विमान प्रवास? अभिनेत्याचे कृत्य पाहून नेटकरी हैराण
View this post on Instagram
यापूर्वी त्या स्त्रीने तिच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर तिने केलेल्या अशा मेसेजेसमुळे सोफियाने तिला ब्लॉक केलं. पण त्या स्त्रीने दुसरे अकाऊंट तयार केले आणि तिला मेसेज करू लागली. त्यानंतर ती स्त्री सोफियाला धमकी देऊ लागली. ती सोफियाला वेश्या देखील म्हणाली. हे सगळं सांगताना सोफिया म्हणाली, “मी अभिनव शुक्लाला ओळखत नाही. जेव्हा मी त्याच्या बद्दल गुगल केलं तेव्हा मला माहित झालं की तो कोण आहे. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. मी त्याच्या सोबत कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हती आणि मी त्याच्यासोबत कधी काम देखील केले नाही. जे माझ्या सन्मानावर प्रश्न करत आहेत, माझ्या विषयी अफवा पसरवत आहेत. त्यांना सत्य काय आहे या विषयी जाणून घेणे गरजेचे आहे. या विषयी ती कायदेशीर कारवाई करणार आहे.”