अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी शुक्रवारी २९ सप्टेंबरला तान्हुलीचे आगमन झाले. या दोघांनी त्यांच्या मुलीचे नाव इनाया नौमी असे ठेवले. सोशल मीडियावर कुणाल आणि सोहा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अपडेट्स देत असतात. सोहा गरोदर असल्यापासून, तिचे बेबी शॉवर, इनायाचा जन्म, तिचा पहिला फोटो हे सर्व अपडेट्स चाहत्यांना सोशल मीडियावर मिळतच होते. सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कुणाल आणि तान्हुल्या इनायाचे बंध पाहायला मिळत आहे.

दिवाळीत कुणालचा आगामी चित्रपट ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ कुणालने इनायासाठी काढला आहे. दोघांचे हे सुरेख क्षण सोहाने कॅमेरात कैद केले आहेत. ‘परिपूर्ण आनंद,’ असे कॅप्शन सोहाने या फोटोला दिले आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सोहाने इनायाला जन्म दिला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोहा आणि कुणालचा इनायासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वाचा : हृतिकमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कंगनाची टाळाटाळ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै २०१४ मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये दोघांनी लग्न केलं. सोहा गरोदर असल्याची बातमीही कुणालने ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. डिसेंबर महिन्यात तैमुरचा जन्म आणि आता सोहाने दिलेल्या या गुड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.