बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार आहे. सोहा आणि कुणाल खेमू यांचे हे पहिलेच बाळ आहे. नुकतंच सोहाचं बेबी शॉवरही करण्यात आले. यावेळी पतौडी कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. सोहाची वहिनी आणि अभिनेत्री करिना कपूर खान, करिष्मा कपूर, कोंकणा सेन शर्मा, नेहा धुपिया यांसह अनेक सेलिब्रिटी सोहाच्या बेबी शॉवरला हजर राहिल्या.

बेबी शॉवरचा कार्यक्रम पूर्ण होताच सोहाने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला. आपल्या आयुष्यातील या खास दिवसाचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

करिष्मा आणि करिना या दोन्ही बहिणींमधील प्रेम जगजाहीर आहे. या दोघींनीही सोहाच्या बेबी शोवरला एकाच प्रकारचे मिलिटरी कलरचे जॅकेट घातले होते. करिष्माने बहिणीसोबतचा फोटो शेअर करत त्याला #twinning#sistergoals#soulsisters#foreverin असे हॅशटॅग्स दिल आहेत.

सोहाने या कपूर सिस्टर्ससोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, फॅशन पोलीस क्वीन्सच्या मध्ये मी अडकलेय.

आत्या सोहा अली खानच्या बेबी शॉवरमध्ये तैमुर अली खान जणू स्टारच होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. तैमुर आपल्या आत्याकडे पाहत असलेला हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधतोय.

बेबी शॉवर म्हटलं की हा पूर्णपणे महिलांचा कार्यक्रम असतो हे वेगळं काही सांगायला नको. त्यामुळे सोहाचा भाऊ सैफ आणि पती कुणाल या कार्यक्रमापासून दूरच राहिले होते. आपल्या गर्ल गँगसोबतचा फोटो शेअर करत सोहाने सर्वांचे आभार मानले आहेत.

कोंकणा सेन शर्मा, नेहा धुपिया यांच्यासह कॅमेऱ्यास पोज देताना सोहा.