बॉलिवूडमधील अभिनेत्री कायमच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. यामध्ये त्यांच्या फॅशनमुळे त्यांच्याबाबत कायमच चर्चा होताना दिसते. नुकतीच सोनाक्षी सिन्हाबाबत अशीच चर्चा सुरु असून आपल्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर तिने एक ट्रान्सपरंट गाऊनमधील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्यावर काहीसे भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आता सोनाक्षी ट्रोल होण्याची ही काही पहीली वेळ नाही. तर यापूर्वीही विविध कारणांनी ती ट्रोल झाली होती. मात्र त्यावेळी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे तिने दाखवून दिले.

नुकताच सोनाक्षीने तिचा लाल रंगाच्या गाउनमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतानाच तिने तो मागच्या जुलैमधील असल्याचे लिहीले आहे. या फोटोमधील तिची मादक अदा अक्षरश: घायाळ करणारी आहे. काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनाक्षीचा लाल ड्रेस आणखीनच उठून दिसत आहे. मात्र तिने घातलेला हा गाऊन पूर्णपणे ट्रान्सपरंट असल्याने युजर्सना तिचा हा फोटो अजिबातच आवडलेला नाही. एरव्ही विविध भूमिकांमधून आपली प्रतिमा जपणारी अभिनेत्री असे काही करते तेव्हा प्रेक्षकांना ते पचवणे काहीसे अवघडच जाते. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक कमेंटसही आल्या आहेत. यामध्ये काहींनी तिला चीप असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तुझे संस्कार कुठे गेले असा थेट सवालच केला आहे. तर काहींनी इतके कपडे तरी कशाला घातलेस अशी उपहासात्मक टीकाही केली आहे.

https://www.instagram.com/p/BhYXD8enQ0C/

सोनाक्षी लवकरच ‘रेस 3’ या आपल्या आगामी सिनेमात प्रेक्षकांना दिसणार आहे. यामध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. यामध्ये सोनाक्षी अभिनेता साकिब सलीमच्या लेडी लवचा रोल करणार आहे. ‘रेस 3’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून सोनाक्षी सिन्हासोबतच या सिनेमांत सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शहा असतील.