भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये खेळला जाणारा क्रिकेट सामना नेहमीच रंजक असतो. दोन्ही देशांमध्ये या सामन्यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. रविवारी भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये सामना रंगला. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा ९४ धावांनी पराभव केला. पाकिस्तानी संघाचा पराभव हा नेहमीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा असतो. अनेकांनी महिला क्रिकेटच्या या सामन्याची तुलना पुरुषांच्या भारत- पाकिस्तान सामन्याशी केली.

होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?

महिलांचा हा विजय म्हणजे त्या अपयशाचा घेतलेला सूड आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. पण महिलांनी केलेल्या या अनन्य साधारण कामगिरीबद्दल सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनीच महिला खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. यात मग बॉलिवूड कलाकार तरी कसे मागे राहतील. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, वरुण धवन यांनी महिला क्रिकेट संघाची भरभरून प्रशंसा केली आहे.  सोनाक्षीने ट्विटर अकाऊंटवरून खेळाडूंची प्रशंसा करत म्हटले की, ‘शाब्बास मुलींनो, कसं जिंकायचं हे तुम्ही दाखवून दिलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे.’ सोनाक्षीने हे ट्विट रात्री १.३० नंतर केले.

भारताने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत ११ व्या सामन्यादरम्यान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अगदी सहजरित्या हरवले. या स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय होता. या सामन्यात गोलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला. अवघ्या ७४ धावांमध्ये भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला माघारी पाठवले. भारताची सर्वोत्तम गोलंदाज म्हणून एकता बिष्टचे नाव नक्कीच घेता येईल. तिने १० षटकांमध्ये दोन निर्धाव षटकं देत १८ धावा देऊन पाच गडी बाद केले.

PHOTOS: प्रेयसी दिशासाठी टायगर सरसावला

मानसी जोशीने दोन गडी बाद केले तर झूलन गोस्वामी, दिप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक- एक गडी बाद केले. पाकिस्तानने दुसऱ्या षटकातच पहिली विकेट गमावली. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीला उतरती कळाच लागली. पाकिस्तानची संपूर्ण टीम ३८.१ ओव्हरमध्येच तंबूत परतली. पाकिस्तानसाठी कर्णधार सना मीरने सर्वाधिक म्हणजे २९ धावा बनवल्या. ती पाकिस्तानकडून सर्वात शेवट आऊट होणारी फलंदाज होती.

सलामी फलंदाज नाहिदा खानने २३ धावा केल्या. एक वेळ अशी होती की पाकिस्तानने फक्त ५१ धावांमध्येच ९ गडी गमावले होते. पण सनाने १० व्या विकेटसाठी २३ धावांची भागिदारी रचली. पण ही भागीदारी परावभामधले केवळ अंतर कमी करण्यासाठीच उपयोगी पडली.