महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होत आहे. बाप्पाच्या सेवेसाठी सर्व भक्त तयार आहेत. दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडे देखील गणपत्ती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदा देखील सोनाली कुलकर्णीने आणि तिच्या भावाने एकत्र येत गणरायाची मूर्ती घरीच साकारली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोनाली तिच्या भावासोबत घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती साकारत आहे. सोनालीचा भाऊ मूर्ती साकारतो तर सोनाली या या मूर्तीची रंगरंगोटी करते.
सोनाली कुलकर्णीचा लग्नानंतर हा पहिला गणेशोत्सव आहे. यंदाही सोनाली आणि तिच्या भावाने गणरायाचं लोभसवाणं रुप साकारलं आहे. सोनाली कुलकर्णीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “वर्षतली ही सर्वात सुंदर वेळ आहे. ३ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न यंदा ही असाच पुढे नेत आहोत…माझा भाऊ अतुल कुलकर्णी शाडू मातीची मुर्ती बनवतो आणि मी हळ्दी-कुंकुवाच्या पाण्यानी रंगवते…तयारी बाप्पा च्या आगमनाची” असं म्हणत सोनालीने हा व्हिडीओ शेअर केलाय. घरच्या घरी बाप्पा साकारण्याचं सोनालीचं हे चौथं वर्ष आहे.
View this post on Instagram
सोनाली आणि तिच्या भावाने बालगणेशाची सुंदर मूर्ती साकारली आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत या व्हिडीओला पसंती दिली आहे. गेल्यावर्षी देखील सोनालीने घरीच बाप्पाची मूर्ती साकारली होती, गेल्यावर्षी सोनाली आणि तिच्या भावाने शंकराचं रुप असलेली गणरायाची मनमोहक मूर्ती साकारली होती.
View this post on Instagram
सोनाली कुलकर्णीप्रमाणे अनेक कलाकार घरच्या घरीच इको फ्रेण्डली बाप्पाची मूर्ती घडवतात.