महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली. सोनाली तिच्या लग्नानंतर पतीसोबत दुबईला होती. आता ते दोघेही एका ट्रीपला गेले आहेत. सोनाली पती कुणाल बेनोदेकरसोबत मालदिवमध्ये सध्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचे काही फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी सोनालीने बिकिनी फोटो शेअर केला आहे.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा बिकिनी फोटो शेअर केला आहे. सोनालीने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील पती कुणालसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या फोटोत सोनालीने तिचा हात कुणालच्या हातात दिला आहे. हा फोटो शेअर करत इथे आम्ही प्रेमाचे वचन दिले, अशा आशयाचे कॅप्शन सोनालीने फोटो शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

सोनालीचा हा हॉट लूक आणि रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याला १ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. या आधी सोनालीने मालदीवमध्ये पोहोचल्याचे काही फोटो शेअर केले होते.

आणखी वाचा : ‘मी वाट पाहू शकत नाही’, अर्जुनने केला मलायकाचा व्हिडीओ शेअर

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सोनाली आणि कुणालने एकदम साध्या पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर हनीमूनसाठी सोनाली आणि कुणाल आफ्रिकेत गेली होती. तर काही दिवसांपूर्वी सोनाली चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परतली होती.